हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. कणकवली न्यायालयात याबाबत आज सुनावणी झाल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालययीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नितेश राणे यांना आज दुपारी सिंधुदुर्ग कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद झाला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अपूर्ण असून अजून खूप तपास करायचा असल्याचे सांगत पोलिसांकडून नितेश राणे यांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी अमान्य करत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन अर्ज मोकळा झाला आहे.
जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे हे जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. तशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे त्यामुळे सत्र न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे