हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पूरग्रस्त कोकणातील पाहणी वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना खडेबोल सूनावल्यानंतर राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी अजितदादांवर टीका केली आहे.
कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, अशा कडक शब्दांत नितेश राणेंनी अजितदादांवर हल्लाबोल केला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते-
काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी? हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र, अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असे पवार यांनी म्हंटल.