हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर काल रात्रीपासून नितेश राणे यांचा तुरुंगातील पुस्तक वाचत असल्याचा एक फोटो शोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो नेमका खरा आहे की खोटा? अन् कधीचा आहे याबाबत आपण जाणून घेऊया.
वास्तविक पाहता या व्हायरल फोटो मागील सत्य आम्ही तपासले असता हा फोटो 5 वर्षांपूर्वीचा आहे. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर राडा केला होता. त्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र सध्या अटक झाल्यानंतर त्यांचा हा जुना फोटो पुन्हा व्हायरल होत आहे.
दरम्यान, संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काल दोन्ही वकिलांच्या सुनावणी नंतर नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राणेंचा मुक्काम दोन दिवस सावंतवाडी पोलीस ठाण्यात असेल. नितेश राणे यांना सावंतवाडीत आणल्याने या परिसरात अनेक राणे समर्थक उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे