हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आल्यानंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले हे अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.