ना पेट्रोलची चिंता, ना चार्जिंगचं टेन्शन; गडकरींची ‘ही’ अप्रतिम कार पहाच

Nitin Gadkari Hydrogen Car
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव देशात नेहमीच आदराने घेतलं जात. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी ओळखले जातात. रस्ते- वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी देशभर रस्त्यांचे मोठं जाळ तयार केलं. गडकरींना गाड्यांमध्ये सुद्धा आवड आहे. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर चालणाऱ्या गाड्यांवरही त्यांचा भर असतो. परंतु गडकरी स्वतः कोणती गाडी चालवतात हे तुम्हाला माहित आहे का? चला आज आपण जाणून घेऊया …

नितीन गडकरी जी कार वापरतात तिचे नाव आहे (Toyota Mirai) टोयोटा मिराई.. ही एक सेडान कार असून ही कार हायड्रोजनवर (Hydrogen Car) चालते. गेल्या वर्षी टोयोटाने ही डेमो कार म्हणून सादर केली असून गडकरींकडे ही कार टेस्टिंग स्वरूपात आहे. नितीन गडकरी म्हणतात की आपण इंधनात स्वयंपूर्ण व्हायला हवे. त्यामुळे हायड्रोजन कारवर भर दिला जात आहे. गडकरींनी सांगितले की एकीकडे इलेक्ट्रिक कारचा खर्च प्रति किमी 1 रुपये आहे तर हायड्रोजन कारमधून प्रवास करताना तुम्हाला प्रति किलोमीटर 1.5 ते 2 रुपये खर्च येऊ शकतो. देशाला जर स्वावलंबी बनवायचे असेल तर आगामी काळात आपण हायड्रोजनवर आधारित इंधनाचे उत्पादन करणे आवश्यक आहे.

टोयोटा मिराई हायड्रोजन फ्युएल सेल टेक्निक वर काम करते. त्यात हायड्रोजन टाकी आहे, ज्याचा गॅस ऑक्सिजनसह रिअक्शन करून गाडीला चालना देतो. यामध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देखील आहे, जी 182 PS पॉवर आणि 406 Nm टॉर्क जनरेट करते. यात 1.24 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. या सेडान कारमध्ये 5.2 किलोग्रॅम क्षमतेची हायड्रोजन टाकी आहे. एकदा का टाकी फुल्ल भरली की ही कार तब्बल 646  किलोमीटरपर्यंत धावू शकते.