Tuesday, June 6, 2023

कोश्यारींचा राजीनामा मंजूर; राज्यपालपदी ‘या’ नेत्याची निवड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला आहे. आपल्याला राज्यपाल पदातून मुक्त करण्यात यावं अशी विनंती काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी केली होती. त्याला राष्ट्रपती कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यांमुळे आता त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. कोश्यारी यांच्यासह देशभरातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल बदलण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. राज्यापालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात होती. छत्रपतींचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी सुद्धा कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतला होती. त्यातच राज्यपालांनी स्वतःच मला पदमुक्त करावं अशी मागणी केल्यांनतर अखेर केंद्राने त्यांना मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे सर्वात चर्चेत असणारे राज्यपाल म्हणून कोश्यारी यांचा उल्लेख केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षातील काळात राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकारमध्ये वाद सुरूच होता. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात पहिली ठिणगी पडली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेक विनंत्या करूनही राज्यपालांनी तेव्हा १२ आमदारांची नियुक्ती केली नव्हती. तसेच कोरोना काळातही भगतसिंह कोश्यारी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटर वॉर चर्चेत आलं होते.