‘या’ दिवशी करणार ग्रीन हायड्रोजन कार लॉन्च; नितीन गडकरींनी सांगितली तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जागतिक महासत्ताक बनण्याकडे भारताकडून पाऊल टाकले जात आहेत. त्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून अनेक गोष्टी तयार केल्या जात आहेत. याची विशेष आवड हि भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी हवेत उडणाऱ्या बसबाबत विधान केले होते. त्यानंतर आता त्यांनी टुरिझम वाढविण्यासाठी एक नवा प्रयोग करणार असल्याचे सांगितले. 16 मार्च रोजी ग्रीन हायड्रोजन गाडी लॉन्च करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुर येथे एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, विदर्भासोबत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासोबत देशाचा विकास होईल. हायट्रोजनवर जगात रेल्वे चालली. काही देशात कार चालत आहे. आता देशातील हायट्रोजनवर पहिली कार दिल्लीत चालणार आहे.

विजेच्या बास्केटमध्ये 33 टक्के सोलर आहे. आता प्रत्येक उद्योगाने आपलं सोलर लावायचं. पण त्याला राज्य सरकार कडून पाहिजे ते प्रमाणात सहकार्य मिळाले नाही. आम्ही आता नवीन प्रयोग करत आहोत. तो म्हणजे हायट्रोजनवर कार चालवण्याचा. हि कार लवकरच रस्त्यावर धावेल, असा विश्वास यावेळी गडकरी यांनी केला.