हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी हे नेहमीच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाणले जातात. गडकरी यांनी आपल्या कामाच्या जोरावर फक्त स्वपक्षीयच नव्हे तर विरोधकांची देखील मने जिंकली आहेत. दरम्यान एका कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल. महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली.
नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे, किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. उद्या जर, एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल.”
दरम्यान, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र काम करण्याची महाराष्ट्राची परंपरा – काँग्रेस आणि आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत. पण, सर्वांनी सोबत येऊन काम करायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी सोबत काम करण्याची मोठी परंपरा आहे. यशवंत राव चव्हाण, शरद पवार, वसंतराव नाईक या सर्वांनी नेहमी विरोधी पक्षाला बरोबर घेऊन राजकारण केलं. कधी कधी त्यांना अमर्याद बहुमत मिळालं तरी देखील चार पाच आमदार असलेल्या पक्षाचा सन्मान केला. पक्षाचे अभिनिवेश असतात. जातीचे अभिनिवेश असतात. मात्र, त्यावरून उठून आपल्याला लोकशाहीचे मूल्य जपून विकास करायचा आहे असेही त्यांनी म्हंटलं.