जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार, गडकरींचा मोदींना टोला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडनुकांकरता पंतप्रधान पदासाठी भाजप चा उमेदवार कोण असणार या विषयावर गेल्या काही दिवसांपासून राजकिय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजप चा दारुन पराभव झाल्यानंतर नरेंन्द्र मोदी यांच्या एवजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे बोलले जात होते. या पार्श्वभुमीवर ‘जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार’ असे विधान नितिन गडकरी यांनी केल्याने पुन्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवार कोण असणार अशा चर्चांना तोंड फुटले आहे. नागपुर येथे आयोजित अभाविप च्या कार्यक्रमात गडकरी ते बोलत होते

नागपुर येथे आयोजित अभाविप च्या कार्यक्रमात गडकरी ते बोलत होते. यावेळी ‘मला खूप लोकं भेटतात. एक कार्यकर्ता म्हणाला, मला माझ आयुष्य भाजपासाठी द्यायचे आहे. तेव्हा मी त्याला विचारले की बाबा तू काय करतो, तर त्याने दुकान चालत नाही म्हणून बंद केल्याचे सांगितले. त्यावर मी त्याला तुझ्या घरी कोणकोण आहेत असे विचारले. त्याने पत्नी, मुले आहेत असे सांगितले. यावर मी त्याला आधी घर सांभाळ असा सल्ला दिला”, असे गडकरी यांनी सांगितले.

हे वाक्य ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. गडकरी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी यामागचे स्पष्टीकरणही दिले. जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही, असे म्हटले. यावरून गडकरी यांनी नेमका कुणावर निशाना साधला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, वाचा काय झाली बातचीत..

म्हणून  पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही – नितीन गडकरी

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

Leave a Comment