हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थितीत आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली.
Acting swiftly on the request, AP Govt has sent 300 ventilators to the state. At this critical time, it will be instrumental in saving precious lives. On behalf of the citizen of the state, I heartily thank him for his swift action.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 23, 2021
दरम्यान, नितीन गडकरी यांनी ट्वीट करत जगमोहन रेड्डी यांचे आभार मानले, “मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फोन केला होता आणि त्यांना महाराष्ट्राला मदत करण्याची विनंती केली होती. यानंतर त्यांनी लगेच 300 व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला पाठवले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो.” अस ट्विट नितीन गडकरी यांनी केले.