हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुक ही भाजप आणि मित्रपक्ष जडयु साठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. च₹निवडणूकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी राजकीय संन्यास घेण्याचीच घोषणा केल्याची चर्चा आता राष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. धमदाहामधील आपल्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे.
This is my last election, says Bihar CM and JD(U) Chief Nitish Kumar during an election rally in Purnia#BiharElections2020 pic.twitter.com/vLSL4uQd4v
— ANI (@ANI) November 5, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेटवच्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. यावेळी धमदाहामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या नितीश कुमार यांनी जाहीर सभेत मोठी घोषणा केली. “आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला”, अशी घोषणाच नितीश कुमार यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’