बिहारमध्ये जेडीयू -आरजेडीच सरकार स्थापन; नितीशकुमारांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल भाजपसोबत असलेली युती तोडत बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पुन्हा बिहारमध्ये आरजेडी – जेडीयूचे सरकार स्थापन केले. बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केल्याने स्थापन झालेल्या या सरकारचा नुकताच शपथविधीही पार पडला. यावेळी नितीशकुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यानू उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

बिहारमध्ये नव्याने सरकार स्थापन केल्यानंतर नितीशकुमार व तेजस्वी यादव यांना पाटणा येथील राजभवनात राज्यपाल फागू चौहान यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी नितीशकुमार यांच्या पक्षातील सर्व नेते उपस्थित होते.

शपथविधीपूर्वी पाटणा येथील 1 आणे मार्गावरील निवासस्थानी नितीश कुमार यांनी जेडीयूच्या आमदार आणि खासदारांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर नितीशकुमार यांनी सर्व नेत्यांसह राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेत बिहारमध्ये सरकार स्थापन केले.

असा आहे नव्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यांचे आमदार जास्त त्यांना अधिक मंत्रीपदे देण्याचे दोन्ही नेत्यांनी ठरवले असून त्यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 तर तेजस्वी यादव यांच्या पक्षाला 21 मंत्रीपदे मिळणार आहेत. डाव्यांना चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर काँग्रेसलाही चांगली खाती दिली जाणार आहे. नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि गृहखाते राहणार आहे. तर तेजस्वी यादव यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद आणि अर्थ खाते राहणार आहे. तर काँग्रेसला महसूल खाते दिले जाणार आहे.