हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण घेण्याच्या वयात आपणही अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलेल्या आणि मनाशी जिद्द करत ते पूर्ण करण्याची किमया लातूरच्या एका लेकीनं करून दाखवली आहे. ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. लातूरच्या नितीश जगताप हिने 21 वर्षांच्या वयात UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पाहूया तिची यशोगाथा….
सलग दोन वर्ष केला UPSC चा अभ्यास
महाराष्ट्रातील लातूर येथील नितीशा जगताप हिने वयाच्या केवळ 21 व्या वर्षी UPSC मध्ये यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे तिनं सहावी परीक्षा उत्तीर्ण होताच 12 वीत असल्यापासूनच आपणही UPSC परीक्षा द्यायची आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवायचं असं ठरवलं होत. पास होण्याचे ध्येय ठेऊन तिने अब्यास करण्यास सुरुवात केली. याचं तिच्या संघर्षाला पदवी उत्तीर्ण होताचं यश मिळालं.
पहिल्याच प्रयत्नांत यश
भारतीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच धाकधूक लागली होती ती म्हणजे नीतिशा हिची. मात्र, नीतिशा बिनधास्त होती. कारण तिला तिच्या यशावर पूर्ण विश्वास होता. कि आपण पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणार म्हणून. निकाल लागताच महाराष्ट्रातील 100 हून अधिक मुलांनी बाजी मारत यश मिळवले. यामध्ये लातूरच्या नितीशा जगताप हिने आपल्या पहिल्याचं प्रयत्नात 199 वे स्थान मिळवत घवघवीत यश प्राप्त केला आहे.
फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण
नीतिशाने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून मानसशास्त्र विषयातून पूर्ण केले. पण आपल्याला काय करायचे हे तिने आधीच ठरवले होते. त्यामुळे बारावी उत्तीर्ण होताच तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. त्यानंतर दोन वर्षे केलेल्या अफाट कष्टाला वयाच्या केवळ 21 व्या वर्षीच तीला फळ मिळालं.
विलक्षण अनुभव
UPSC ची परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी नीतिशाची मुलाखत घेण्यात आली तेव्हा मुलाखत देणं तिला फारसं कठीण गेलं नाही. मुलाखतीत विचारलेल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं तिने आत्मविश्वासानं दिली आणि ज्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती त्याबद्दल तिने स्पष्ट सांगितलं.