10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम

Tax Saving
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदारांना दिलासा देताना इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा केली. त्याअंतर्गत आता नवीन टॅक्स सिस्टीम स्वीकारणाऱ्या करदात्यांना 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही.

मात्र 7 लाखांपेक्षा जास्तीच्या वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागेल. तसेच जर 10 लाख रुपये वार्षिक पगार असलेल्या व्यक्तीनेही योग्यपणे नियोजन केले तर त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. याबाबत टॅक्स एक्सपर्ट म्हणतात कि,”10 लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स वाचवण्यासाठी करदात्यांना जुन्या टॅक्स सिस्टीमचा पर्याय निवडावा लागेल.” Income Tax

What is Income Tax, Income Tax Planning, IT Returns, Income Tax Slabs

तसे पहिले तर केंद्र सरकारने या वर्षी नवीन टॅक्स सिस्टीममध्ये मूळ कर सवलतीची व्याप्ती वाढवून 3 लाख रुपये केली आहे. त्याचप्रमाणे जुन्या टॅक्स सिस्टीममध्ये असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच त्याअंतर्गत कर सवलतीची मर्यादा अजूनही 2.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन टॅक्स सिस्टीमची खास बाब अशी कि,यामध्ये कोणत्याही प्रकारची बचत किंवा कर सूट दिली जात नाही, तर जुन्या टॅक्स सिस्टीममध्ये होम लोनपासून विमा पॉलिसीपर्यंत कर बचतीची सुविधा उपलब्ध आहे. Income Tax

10 लाखांच्या उत्पन्नावर झिरो टॅक्स

लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनुसार, RSM चे संस्थापक असलेले डॉ. सुरेश सुराणा सांगतात कि,” पगारदार व्यक्तीला त्याच्या नोकरीतून एकूण उत्पन्न 10 लाख रुपये असले तरीही त्याला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. जर एखाद्या करदात्याने जुन्या टॅक्स सिस्टीमनुसार योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याचे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नही टॅक्स फ्री होऊ शकेल, कारण जुन्या टॅक्स सिस्टीममध्ये अनेक सूट उपलब्ध आहेत.” Income Tax

Income Tax Rules: Your such income is not taxed, know the terms and  conditions - Business League

स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ

डॉ. सुराणा म्हणतात की,” 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम स्टँडर्ड डिडक्शन म्हणून उपलब्ध आहे. सर्वात आधी ती आपल्या उत्पन्नातून वजा करा. हे 50,000 रुपये 10 लाखातून वजा केल्यानंतर 9,50,000 रुपये निव्वळ होईल, ज्यावर टॅक्स भरावा लागेल.

कलम 80C

जुन्या टॅक्स सिस्टीममधील इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, EPF, PPF, ELSS, NSC मध्ये गुंतवणूक करून 1.5 लाख रुपये वाचवता येतात. हे 1.5 लाख रुपये कापल्यानंतर, आपले कर दायित्व 8.5 लाख रुपयांवर येईल.

ITR filing: This income tax return violation may land you in jail. Details  here | Mint

कलम 80CCD

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये वार्षिक 50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करून कलम 80CCD (1B) अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये 50,000 रुपये वाचवता येतात. यानंतर आपल्या एकूण उत्पन्नातून हे 50 हजार रुपये वजा करा. आता आपले 7.5 लाखांचे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येईल.

कलम 24B

जर आपण घर घेतले असेल तर वार्षिक 2 लाख रुपयांचा टॅक्स वाचवता येईल. हे लक्षात घ्या कि, कलम 24B अंतर्गत होम लोन टॅक्स फ्री आहे. आपल्या वार्षिक उत्पन्नातून देखील वजा करा. आता फक्त 5.50 लाख रुपयेच टॅक्सच्या कक्षेत येतील. Income Tax

Income Tax Department issues FAQs on ITR filing - BusinessToday

कलम 80D

IT कायद्याच्या कलम 80D अंतर्गत मेडिकल पॉलिसी घेऊन 25,000 रुपयांपर्यंतचा टॅक्स वाचवता येईल. याशिवाय, जर आपले पालक ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांच्या नावावर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करून 50,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त वजावट मिळवता येईल. अशा प्रकारे 75,000 रुपयांची बचत आपले कर दायित्व 5,50,000 रुपयांवरून 4,75,000 रुपये होईल. Income Tax

कलम 87A

इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये हे स्पष्ट सांगितले गेले आहे की,” 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावरील टॅक्स 12,500 रुपये (2.5 लाख रुपयांच्या 5%) आहे. अशा परिस्थितीत, इन्कम टॅक्स कलम 87A अंतर्गत 12500 रुपयांची सूट उपलब्ध आहे, कारण सर्व कपातीचा फायदा घेऊन 5 लाखांच्या स्लॅबमध्ये आला आहात. ज्यामुळे झिरो टॅक्स भरावा लागेल.”

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx

हे पण वाचा :
IRCTC App द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगची प्रक्रिया जाणून घ्या
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
Voter ID-आधार लिंकिंगसाठी सरकारकडून देण्यात आली मुदतवाढ
’31 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी नाही, रविवारीही होणार कामकाज’ – RBI चा आदेश