राज्यात पुन्हा लॉकडाऊनच्या वृत्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की, कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियातून पसरलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment