Monday, January 30, 2023

मनसेचा पुन्हा मराठी बाणा ; मुंबईभर लावले ‘नो मराठी नो अ‍ॅमेझॉन’चे फलक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा घेतला आहे. आता मनसेनेने ई-कॉमर्स कंपनीकडे वळवला आहे .Amazon वर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेनेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून मुंबईत Amazon विरुद्ध फलक लावण्यात आले असून त्यावर ‘नो मराठी, नो Amazon’,असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

हे फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहिम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले असून आता Amazon यावर काय तोडगा काढणार हे पहाव लागणार आहे.

- Advertisement -

अ‍ॅमेझॉन’चे अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मनसेची मागणी आहे. मराठी भाषेचा यात समावेश करता येणार नाही असे अॅमेझॉनकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक होत अॅमेझॉन विरोधात मोहीम सुरू केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’