हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांना कोणीही वाचवू शकत नाही असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करत आहेत. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार आहे. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलंय. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा असंही ते म्हणाले
यावेळी त्यांनी आनंदराव अडसूळ यांच्या ईडी प्रकरणावर देखील भाष्य केले. सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. अडसूळ आणि उद्धव ठाकरे याबाबत उत्तर देत नाहीत. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली. त्याचं मी स्वागत करतो, अशा शब्दात अडसूळांवरील कारवाईचं सोमय्या यांनी स्वागत केलं आहे.