31 मे पर्यंत पुणे स्टेशनवर मिळणार नाही प्लॅटफॉर्म तिकीट; रेल्वे प्रशासनाची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोरोना साथीचा धोका टाळण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकात अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी सध्या 31 मे पर्यंत सामान्य लोकांना प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार नाहीत. त्याचबरोबर वृद्ध, अपंग, रूग्ण, गर्भवती महिला, मुले यांसारख्या गरजू प्रवाशांना मदत करण्याच्या उद्देशाने 50 रूपये (पन्नास रुपये) च्या वाढीव दराने प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात आहेत. करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कोल्हापूर, मिरज आणि सांगली स्थानकांवर अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी 31 मेपर्यंत वाढीव दराने प्लॅटफॉर्म तिकिटे दिली जातील. येथे तिकिटांची किंमत फक्त 50 रुपये असेल. इतर स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर आधीपासून जारी केलेल्या प्रणालीनुसार साधारणत 10 रुपये ठेवला जाईल. पहिल्या लाटेदरम्यान देखील असाच निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या लाटेत पण प्लॅटफॉर्म तिकीट 10 वरून 50 करण्यात आले होते.

पुण्यामध्ये करोना वेगाने पसरतो आहे. देशातील सगळ्यात जास्त संक्रमित शहरांमध्ये पुण्याचा नंबर लागतो. पुण्यामधून देखील बेड न मिळण्याचे सूर उमटत आहेत. ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहे. अश्या वेळी लोकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये म्हणून विनंती केली जात आहे. विनाकारण स्टेशनला गर्दी होऊ नये म्हणून हे अशे निर्णय घेतले जात आहेत. यामुळे सध्या पुणे, कोल्हापूर, मिरज आणि सांगली स्टेशनचे प्लॅटफॉर्मचे तिकीट वाढले आहे. अनावश्यक गर्दी करू नये.

Leave a Comment