रोहित पवारांचा ‘लोकल’ प्रवास; एकटेच पडले बाहेर, न सुरक्षा रक्षक, न कोणी कार्यकर्ते सोबत न समर्थकांचा गराडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मुंबईलोकलने प्रवास केला आहे. यावेळी रोहित पवारांसोबत कोणीही कार्यकर्ता किंवा समर्थक नव्हते. या लोकलप्रवासंबंधी सोशल मीडियावर अनुभव शेअर करताना रोहत पवारने यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील लोकल प्रवासाच्या आठवणी जागवल्या.

”मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या लोकल प्रवासाचे फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वीही रोहित पवार यांनी मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला होता. त्यावेळी, मी एक दिवस त्यांच्यातला डबेवाला बनल्याचं सांगताना, डबेवाल्यांसोबतच्या एक दिवसाचा अनुभव रोहित यांनी शेअर केला होता.

कोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकससेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता ही लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यातच, लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्वीप्रमाणे सुरू व्हावी, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment