SBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क, ‘या’ साइटला कधीही भेट देऊ नका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात बँकिंग फसवणूकीची प्रकरणे दररोज वाढतच आहेत. आजकाल फसवणूक करणाऱ्यांनी ग्राहकांची अनेक नवीन मार्गांनी फसवणूक करण्यास सुरवात केली आहे. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली SBI (State Bank of India) आपल्या ग्राहकांना सतर्क करत राहते. याच अनुषंगाने बँकेने एक ट्विट जारी करून आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये एसबीआय आपल्या ग्राहकांना असे कोणतेही मेल पाठवत नसल्याचेही सांगितले आहे.

आजकाल बँकेचे ग्राहक कोणत्याही माहितीसाठी गुगलचा वापर करतात, मात्र आपण बर्‍याच वेळा गुगलवर शोध घेतल्यानंतरही ग्राहकांना योग्य माहिती मिळू शकत नाही. म्हणूनच, बँकेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आपण बँकेची अधिकृत वेबसाइट वापरली पाहिजे.

एसबीआयने ट्विट करुन माहिती दिली
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केले आहे की, ग्राहकांनी बँकेशी संबंधित कोणत्याही सेवेबद्दल जाणून घेण्यासाठी हेल्पलाइन नंबर किंवा वेबसाइट वापरली पाहिजे.

या वेबसाइटला भेट द्या
गूगल सर्चद्वारे अनेक वेळा लोकं बनावट वेबसाइटवर जातात, म्हणून एसबीआय बँकेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी किंवा अपडेट्ससाठी https://bank.sbi वर भेट द्या असे बँकेने म्हटले आहे.

https://t.co/AKPQygX3pl?amp=1

टोल फ्री क्रमांकावर कॉल करा
एसबीआयने कस्टमर्स केअरचा नंबर ही जारी केला आहे. कोणत्याही माहितीसाठी कस्टमर्स केअर्सचे नंबर 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 वर संपर्क साधू शकता आणि बँकेशी संबंधित कोणतीही माहिती घेऊ शकता.

https://t.co/oZkUOxvDXa?amp=1

फेक मेल्समध्ये अडकू नका
याशिवाय एसबीआयने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सतर्क केले असून ते म्हणाले की, फेक ई-मेल आमच्या ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. एसबीआयचा या ई-मेल्सशी कोणताही संबंध नाही. या प्रकरणात, आपण ईमेल उघडणे टाळावे. एसबीआय म्हणाले, ग्राहकांनी सोशल मीडियावर सावध रहावे आणि कोणत्याही दिशाभूल आणि फेक मेसेजमध्ये जाऊ नये अशी विनंती केली जाते. बँकेने म्हटले आहे की, जर आपण त्याची काळजी घेतली नाही तर तुमचे बँक खाते रिकामे घेऊ शकते.

https://t.co/NPKxqZPj6e?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment