नको तो विक्रम! देशात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनामुळे लोकांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे,तसेच अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आणि विषाणू च संक्रमण होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच भारत हा जगातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमकांवर पोहचला आहे.

केंदीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 48 हजार 916 नवीन रुग्णांचा समावेश झाला आहे या नवीन आकडे वारीनुसार आत्तापर्यंत कोरोनाचे 13 लाख 36 हजार 816 इतकी आकडेवारी झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत 68,097 नवीन लोकांची चाचणी करण्यात आली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी संक्रमित झालेल्या रुग्णाची संख्या कमी आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 757 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे तसेच 4 लाख 56 हजार 071 लोकांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या आजारावर यशस्वी पणे मात करून आत्तापर्यंत 8 लाख 49 हजाराहून अधिक आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचा रेट 63.5 टक्के इतका आहे तर मृत्यूचे प्रमाण 2.3 इतके आहे. कोरिना रुग्णाच्या बाबतीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावरील देश आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 3.5 लाख कोरोना ग्रस्त लोक आहेत. तामिळनाडू मध्ये 2 लाख लोक कोरोनाच्या आजाराने ग्रस्त आहेत. देशामध्ये जास्त रुग्णाच्या आकडेवारी मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment