हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री Nora Fatehi ही आणि पिंकी इराणी यांची गुरुवारी ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) करण्यात आलेल्या 5 तासांच्या चौकशीदरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. याप्रकरणी Nora Fatehi ला याआधीही अनेक वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमकडून सोफिया सिंग, निकिता तांबोळी, आरुषा पाटील आणि चाहत खन्ना या चार अभिनेत्रींचीही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यांनी तिहार तुरुंगात असताना सुकेशची भेट घेतली होती.
दुसरीकडे, सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील बुधवारी दिल्लीतील EOW कार्यालयात हजर झाली होती. या चौकशी दरम्यान जॅकलिनने दिलेल्या उत्तराने EOW अधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही. ज्यामुळे दिल्ली पोलीसांकडून पुन्हा एकदा जॅकलिनची चौकशी केली जाणार आहे. यावेळी EOW च्या टीमने सुकेशने जॅकलिनला कोण-कोणते गिफ्ट दिले याची लिस्ट तयार करण्यास सांगितले आहे. या चौकशीदरम्यान जॅकलीन काही वेळा भावूक झाल्याचेही सांगण्यात आले. Nora Fatehi
काही दिवसांपूर्वी ED कडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान आरोपी सुकेश चंद्रशेखरने Nora Fatehi ही आणि जॅकलीन फर्नांडिस यांना लक्झरी कारसहीत अनेक महागड्या गिफ्ट्स दिल्याचा खुलासा केला होता. याआधी 14 ऑक्टोबर 2021 रोजी नोरा आणि सुकेश यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली. यादरम्यान खुद्द Nora Fatehi ने 1 कोटींहून जास्त किंमत असलेली आलिशान कार भेट म्हणून घेतल्याची कबुली दिली होती.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.instagram.com/norafatehi/?hl=en
हे पण वाचा :
England Tour of Pakistan : 17 वर्षांनंतर इंग्लिश क्रिकेट संघ पाकिस्तानात, PCB ने शेअर केले फोटो
Bank of Baroda च्या ग्राहकांना आता FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा
‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न
PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा
IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा