कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांकडून ट्रोल

0
67
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । प्रचाराच्या वेगात शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात झालेल्या चुकांमुळे कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांमधून चांगलेच ट्रोल होत आहेत. आज दिवसभर या जहिरनाम्यातील चुकीमुळे सोशल मिडिया मध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.

“वेडात दौडले वीर मराठे सात” असं एक मराठी समरगीत आहे. या गीताचा आधार घेऊन कोल्हापूरच्या शिवसैनिकांना प्रेरित करण्यासाठी कोल्हापूरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी आपल्या जाहीरनाम्यात या गीताची एक ओळ वापरली आहे. पण प्रचाराच्या वेगात ती ओळ जाहीरनाम्यात “वेगात दौडले वीर मराठे सात” अशी छापली गेल्यामुळे राजेश क्षिरसागर यांचे काँग्रेसचे विरोधी उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या समर्थकांनी त्यांची चांगलीच चुटकी घेतली आहे.

यावरून सेनेचे आणि काँग्रेसच्या समर्थकांच्यात सोशल मिडिया मध्ये चांगलीच जुंपली आहे. एवढंच नाही तर आपण या सारख्या मूर्खपणा करायचा नाही असा देखील उल्लेख झाल्यामुळे नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here