हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Free Ration : केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वीच देशातील नागरिकांना भेट देण्यात आली होती. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत केंद्र सरकारने 2023 मध्ये देखील मोफत अन्नधान्य वाटप करण्याची घोषणा केली आहे. हे लक्षात घ्या कि, कोरोना काळापासून आतापर्यंत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन देण्यात येत होते.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांनाही मोफत रेशन (Free Ration) दिले जात होते. मात्र, आता फक्त गरीब शिधापत्रिकाधारकांनाच मोफत गहू आणि तांदूळ मिळणार आहे. हे जाणून घ्या कि, कोरोना साथीच्या काळामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सरकार ही योजना बंद करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने ती सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही योजना अन्न सुरक्षा योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत मोफत रेशन देण्यासाठी होणारा सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या खर्चाचा भर केंद्र सरकारकडून उचलला जाणार आहे. यासाठी राज्यांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत.
नवीन वर्षात काय बदल होणार ???
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील नागरिकांना गहू, तांदूळ आणि भरड धान्य 1 ते 3 रुपये प्रति किलो दराने दिले जात आहे. तसेच, डिसेंबर 2023 पर्यंत ते सुरूच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या 3 वर्षापासून या योजनेचे 7 टप्पे पूर्ण झाले आहेत. सर्वांत आधी मार्च 2020 मध्ये, पहिल्या टप्प्यात एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ती सुरु करण्यात आली होती. Free Ration
देशात धान्याचा साठा किती आहे ???
अतिरिक्त वाटप करण्यासाठी सरकारकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकारने नुकतेच सांगितले आहे. याबरोबरच 1 जानेवारी 2023 रोजी आणखी 159 लाख मेट्रिक टन गहू आणि 104 एलएमटी तांदूळ देखील उपलब्ध होईल. केंद्र सरकारने म्हटले की, दरवर्षी 1 जानेवारीला 138 एलएमटी गहू आणि 76 एलएमटी तांदूळ स्टॉकमध्ये असणे आवश्यक आहे. यावेळी त्याहून जास्त साठा उपलब्ध होणार आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत केंद्रीय पूलमध्ये सुमारे 180 LMT गहू आणि 111 LMT तांदूळ उपलब्ध होते. यामुळेच सरकारकडून 2023 मध्येही मोफत रेशन (Free Ration) वितरणाची योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे लक्षात घ्या कि, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 (NFSA) अंतर्गत, सर्व लाभार्थी (विशेषतः स्थलांतरित लाभार्थी) वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) सिस्टीमद्वारे या योजनेचा लाभ घेत आहेत. सर्व लाभार्थ्यांना सध्याच्या रेशन कार्डचा वापर करून किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन वापरून आधार क्रमांकाद्वारे देशातील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (EPOS) मधून मोफत धान्य (Free Ration) मिळत आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nic.in/infographs_post/one-nation-one-ration-card/
हे पण वाचा :
Car कंपन्यांकडून कार खरेदीवर दिली जाते आहे लाखो रुपयांची सवलत, जाणून घ्या यामागील कारणे
Business Idea : हमखास कमाई मिळवून देणार ‘हा’ व्यवसाय, कसा सुरू करावा ते जाणून घ्या
BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये डेटासोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग
Bank Holidays : जानेवारीमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, इथे पहा लिस्ट
Jio कडून नवीन वर्षासाठी धमाकेदार रिचार्ज प्लॅन लाँच, जाणून घ्या अधिक तपशील