नवी दिल्ली । क्रिप्टो ट्रेडिंग फर्म Oropocket ने सोने आणि चांदीची गॅरेंटी असलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर सुरू केली आहे. Oropocket चे सुमारे 8,000 युझर्स आणि अंदाजे $ 350,000 ची एसेट अंडर मॅनेजमेंट आहे. या ऑफरमध्ये, गुंतवणूकदार UPI किंवा कार्ड्ससारख्या मोडद्वारे पेमेंट ट्रान्सफर करून मौल्यवान धातू खरेदी करू शकतात आणि त्या बदल्यात त्यांना क्रिप्टोकरन्सी दिली जाईल.
Oropocket च्या सह-संस्थापक तरूषा मित्तल म्हणाल्या, “बचत खाते आणि FD वरील व्याजदर कमी आहेत आणि महागाईवरही मात करू शकत नाहीत. आमचा विश्वास आहे की लोकांकडे पर्याय असावा. ” त्यांनी सांगितले की, Oropocket च्या माध्यमातून युझर्स सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यासाठी, फिजिकल गोल्ड आणि चांदी त्यांच्या क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात तिजोरीत साठवल्या जातील.
मात्र, यामध्ये गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीच्या खरेदीवर 3 टक्के GST भरावा लागेल. देशातील डिजिटल गोल्ड सेगमेंटचा एक मोठा भाग नियंत्रित नाही. पेटीएम मनी आणि कुवेरा सारखे काही Apps डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. गुंतवणूकदार गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्समध्येही गुंतवणूक करू शकतात.
भांडवली बाजार नियामक SEBI ने अलीकडेच गोल्ड एक्सचेंज साठी मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली आहे. यामध्ये सोन्याचे ट्रेडिंग इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या दराच्या स्वरूपात केला जाईल.