केवळ नेस्लेच नाही तर तुमचे आवडते ब्रॅण्डसुद्धा ‘अनहेल्दी’ खाद्यपदार्थां संदर्भात सापडले होते वादात… त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठ्या फूड अँड ड्रिंक कंपन्यांपैकी एक असलेली नेस्ले या दिवसांत वादात आहे. मॅगी, किटकॅट आणि नेसकॅफे बनवणाऱ्या नेस्लेचे 60 टक्के खाद्यपदार्थ अनहेल्दी (Unhealthy Food) आहेत. कंपनीने स्वतः हे स्वीकारले आहे आणि आता आपल्या प्रोडक्ट्समध्ये पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी नवीन रणनीतीवर काम करीत आहे. तथापि, हा वाद केवळ नेस्लेपुरताच मर्यादित नाही. याआधीही अशा अनेक कंपन्या हानिकारक खाद्यपदार्थ संदर्भात वादात अडकल्या आहेत. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात-

मॅगी मध्ये MSG
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) 2015 मध्ये मॅगीवर बंदी घातली होती. ही बंदी घालण्यात आली होती कारण चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, मॅगीमध्ये जास्त प्रमाणात शिसे होते आणि त्याच्या पॅकेटवर भ्रामक पद्धतीने ‘नो एडेड एमएसजी’ असे लिहिले गेले होते. त्याचवेळी नेस्लेने चव वाढवणाऱ्या मोनोसोडियम ग्लूटामेटचे प्रमाण सूचित केलेले नव्हते. मात्र, वादाच्या भोवऱ्यात आल्यानंतर नेस्लेने ‘नो एडेड एमएसजी’ चा दावा फेटाळून लावला. नंतर नेस्लेने मॅगीला पुन्हा बाजारात आणले.

दिल्ली येथील स्वयंसेवी संस्था आणि विज्ञान आणि पर्यावरण मंत्रालयाने (CSE) केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, पतंजली, डाबर आणि झंडू यासारख्या अनेक लोकप्रिय ब्रँड विकत असलेल्या मधात ऊस, तांदूळ, मका, बीटपासून बनविलेले साखरेचे सिरप जास्त प्रमाणात मिक्सिंग केले होते. विक्रेते हे साखर युक्त मध ‘शुद्ध मध’ म्हणून विकतात. नंतर जेव्हा हे तपासले गेले तेव्हा 77 टक्के मधात साखर सिरपचे भेसळ असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, जे ब्रॅण्ड्स त्यावेळी चाचणीत पास झाले नव्हते अशा ब्रँडने त्या अभ्यासाचे दावे नाकारले आणि दावे खोदून काढण्यासाठी वृत्तपत्रांत विस्तृत जाहिराती दिल्या.

मदर डेअरी मध्ये डिटर्जंट
2015 मध्ये मदर डेअरीच्या दुधाच्या नमुन्यांमध्ये डिटर्जंट सापडले. उत्तर प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाने याचा खुलासा केला. तथापि, मदर डेअरीने सॅशेमध्ये विकल्या जाणाऱ्या दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ नाकारली आहे.

ब्रिटानियातील कार्सिनोजेन्स (Carcinogens)
2016 मध्ये CSE चाचणीत असे आढळले की, ब्रिटानियाचे पॅकिंग ब्रेड्स, पाव आणि बन्समध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि आयोडेट असतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जातात. या अभ्यासात डोमिनोज, मॅकडोनाल्ड्स आणि सबवे सारख्या फास्ट फूड चेनमधील बन आणि पिझ्झा बेसमध्ये रासायनिक अवशेष आढळले. नंतर यावर बंदी देखील आणली गेली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment