व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

माझ्याकडे लक्ष देत नाही, कोणत्या बाईला फिरवता प्रश्नाने पत्नीला मारहाण

सातारा | सातारा तालुक्याताली सावली- रोहोट येथे पत्नीने विचारलेल्या प्रश्नामुळे खवळलेल्या पतीने चक्क काठीने मारहाण केली. पतीला माझ्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, असा प्रश्न पत्नीने विचारला. त्यामुळे संतापलेल्या पतीने हातात काठी घेऊन पत्नीला बदडले. याप्रकरणी संबंधित पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पती पत्नीच्या वादाचे अनेक किस्से समोर येत असतात. संतापाच्या भरात पत्नीच्या तोंडून गेलेले शब्द पतीच्या जिव्हारी लागले. तेव्हा हा काैटुंबिक वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. पती काहीही कामधंदा करत नसल्याचा राग पत्नीला होता. त्यातच माझ्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, असा प्रश्न पत्नीने पतीला केला.

त्यामुळे चिडलेल्या पतीने घरातील काठी हातात घेऊन पत्नीच्या डाव्या पायावर, हातावर मारहाण केली. या मारहाणीत पत्नी जखमी झाली आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून पतीवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक आवळे हे करत आहेत.