नवी दिल्ली | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या अथवा ऐकल्या असतील मात्र या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला शरीर संबंध ठेवताना माहित असेल की या नात्याचे लग्नात रूपांतर होणार नाही आणि तरी देखील ती स्वेच्छेने शरीर संबंध ठेवत असेल तर मग तो बलात्कार होऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान म्हणले आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय मानला जातो आहे.
या तारखेला राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक करणार भाजपमध्ये प्रवेश
न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठाने विक्रीकर सह आयुक्त असणाऱ्या महिलेची याचिका या आधारावरच फेटाळून लावली आहे. या अधिकारी असणाऱ्या महिलेने सीआरपीएफ मध्ये डेप्युटी कमांडंट असणाऱ्या व्यक्तीवर बलात्काराचे आरोप लावले होते. या खटल्याची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने सांगितले की , दोघांमध्ये ८ वर्षांपासून प्रेम संबंध होते. या काळात ते एकमेकांच्या घरी देखील जाऊन राहत असत. याचाच अर्थ होतो की दोघांमध्ये जे काय होतं ते सम्मतीने होत होते. त्यामुळे हा बलात्कार होऊ शकत नाही.
राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो तर बाळासाहेब थोरातांचा का नाही : सुजय विखे
याचिकाकर्ती महिला संबंधित पुरुषाला १९९८ पासून ओळखत होती असे त्या महिलेने आपल्या याचिकेत म्हणले आहे. त्याच प्रमाणे २००८ साली त्या पुरुषाने त्या महिले सोबत लग्नाचे अमिश दाखवून शरीर संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर त्याने २०१४ साली जातीच्या कारणामुळे आपल्यात विवाह होऊ शकत नाही असे त्या महिलेस सांगितले. तरी देखील २०१६ पर्यंत त्या महिलेने त्या पुरुषासोबत शरीर संबंध ठेवले. त्यानंतर त्या पुरुषाने आपल्या जातीतील एका स्त्री सोबत साखरपुडा केल्यानंतर या महिलेने त्याच्या विरोधात याचिका दाखल केली. यात न्यायालयाने महिलेला पुढील परिणामाची पूर्वकल्पना असताना तिने त्या पुरुषासोबत शरीर संबंध ठेवल्याने हा बलात्कार होऊ शकत नाही असे म्हणले आहे.