कोरोना लसीच्या वादादरम्यान नोव्हाक जोकोविचने जिंकला 2022 चा आपला पहिला सामना

दुबई । ऑस्ट्रेलियन ओपनला मुकलेल्या नोव्हाक जोकोविचने 2022 चा पहिला सामना दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये लोरेन्झो मुसेट्टीचा 6-3, 6-3 असा पराभव करून जिंकला. जोकोविच गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले विजेतेपद वाचवू शकला नाही. कोविड लसीकरण न केल्यामुळे जोकोविचला ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले होते.

संयुक्त अरब अमिरातीने त्याला प्रवेशाची परवानगी दिली आणि जोकोविचने 2022 या वर्षाची सुरुवात या स्पर्धेने केली, ज्यामध्ये त्याने 5 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये मुसेट्टीने जोकोविचविरुद्ध दोन सेट जिंकले होते, मात्र त्याला ब्रेक पॉइंट मिळविण्याच्या अनेक संधींचा फायदा घेता आला नाही.

जोकोविचने सामन्यानंतर सांगितले की,”मी माझ्या खेळावर समाधानी आहे. विशेषत: जेव्हा मी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून खेळू शकलेलो नाही. जोकोविचचा पुढील सामना कॅरेन खाचानोव्ह आणि एलेक्स डी मिनौर यांच्यातील विजेत्याशी होईल.”