नवी दिल्ली । लोखंड आणि स्टीलच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या वापराबाबत केंद्र सरकार लवकरच रोडमॅप तयार करणार आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी अधिकाऱ्यांना लोह आणि पोलाद निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्याच्या शक्यतेवर वेगाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी महिनाभरात रोडमॅप तयार केला जाईल, असा दावा आरसीपीने केला आहे.
देशात प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. प्लास्टिक कचऱ्याचा वापर आणि विल्हेवाट लावण्याबाबत पर्यावरण तज्ज्ञही केंद्र सरकारला इशारा देत आहेत. प्लास्टिक कचरा ही देशातील मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत पोलाद मंत्रालयाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.
Discussion held at Steel ministry on use of plastic in blast furnace in Steel making.
This ‘Waste to Wealth' model will help in substituting coking coal by plastic which will immensely help in reducing plastic pollution in an ecofriendly manner.@PMOIndia @moefcc @MoHUA_India pic.twitter.com/6DhhDGa1gZ— RCP Singh (@RCP_Singh) February 7, 2022
प्लास्टिक कचऱ्याबाबत असा रोडमॅप तयार करण्यात येणार आहे
पोलाद मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, जगभरातील अनेक देश प्लास्टिक कचऱ्याच्या प्रभावी वापराचा पर्याय शोधत आहेत. काही देश लोखंड आणि पोलाद उद्योगात याचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत भारत सरकारचे पोलाद मंत्री आरसीपी यांनीही पोलाद मंत्रालयाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे.
सोमवारी नवी दिल्लीत पोलाद मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरसीपी सिंग यांनी ही माहिती दिली. या बैठकीत पोलाद मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत ते म्हणाले की,”प्लास्टिक कचऱ्याचा वापर/विल्हेवाट हा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”