केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळाच्या धर्तीवर महापालिका पातळीवर यंत्रणा तयार करण्याची मागणी

पुणे | शहरात खुलेआम अगदी मनपा कर्मचाऱ्यांकडूनही पालापाचोळा/ कचरा जाळला जातो, भर रस्त्यावर बागेमध्ये भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना दाणे टाकून त्यांच्या पंखाद्वारे दम्याचे जंतू प्रसार होतो, अनेक वाहने प्रचंड धूर ओकत रस्त्यावरून वाहतूक करत असतात अशा सर्व विषयी दाद कुणाकडे मागायची? याची कसलीही यंत्रणा आज स्थानिक पातळी उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्रदूषण थांबवणारी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई … Read more

ध्वनी प्रदूषण केल्याने सातारा जिल्ह्यात पहिला गणेश मंडळावर गुन्हा

Shahupuri Satara Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सर्वाेच्च न्यायलयाचा ध्वनि प्रदूषणाचा आदेश धुडकावून विना परवाना मोठ्या आवाजात स्पीकर लावल्या प्रकरणी सातारा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शाहूपुरी पोलिसांनी सदरबझार येथील श्रीमंत युवा गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह चालक, साऊंड सिस्टीम चालकासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत भगवान मोहिते (वय- 31, रा. … Read more

एकच चर्चा : साताऱ्यात कचरा डेपोवर मिसाईल हल्ला?

सातारा प्रतिनिधी | महेश पवार सातारा तालुक्यातील सोनगाव कचरा डेपोवर कुणी जैविक मिसाईल हल्ला केला याची चर्चा जोरदार रंगली. सातारा शहराचा कचरा गोळा करून सोनगाव येथील कचरा डेपो येथे टाकला जातो. परंतु याच कचरा डेपोला आज आग लागून संपुर्ण परिसरात धुराचे लोट वाहताना दिसत होते. यावेळी गाडी चालविणे सुध्दा अवघड होत असल्याने थांबलेल्या लोकांमध्ये चर्चा … Read more

हिंदु जनजागृती समिती,सनातन संस्‍था आणि खडकवासला ग्रामस्‍थ यांच्यातर्फे खडकवासला जलाशय रक्षण अभियान

पुणे | हिंदु संस्‍कृतीतील प्रत्‍येक सण, उत्‍सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्‍यात्‍मिक उन्‍नतीला पोषक आहेत; मात्र सण-उत्‍सवांमागील धर्मशास्‍त्र सर्वसामान्‍यांना अवगत नसल्‍याने उत्‍सवांमध्‍ये अपप्रकार शिरल्‍याचे दिसून येते. धर्मशिक्षणाच्‍या अभावी सण-उत्‍सव यांमागील मूळ उद्देशच लोप पावत चालला असून अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग लावून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे, हा या अपप्रकारांमधीलच एक … Read more

कृष्णानदी प्रदूषणा विरोधात सायकलपट्टू दत्ता पाटील यांचे अन्न त्याग आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीच्या पाचवीला पुजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. शेरीनाल्याच्या बंधार्‍याजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळण्याचे थांबत नाही. एकीकडे प्रशासनाकडून कृष्णा माई स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात प्रदूषण … Read more

आता लोखंड आणि पोलाद निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्यासाठी तयार करण्यात येणार रोडमॅप

नवी दिल्ली । लोखंड आणि स्टीलच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या वापराबाबत केंद्र सरकार लवकरच रोडमॅप तयार करणार आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी अधिकाऱ्यांना लोह आणि पोलाद निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्याच्या शक्यतेवर वेगाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी महिनाभरात रोडमॅप तयार केला जाईल, असा दावा आरसीपीने केला आहे. देशात प्लास्टिक कचरा ही … Read more

तब्बल 87 कोटी रुपये खर्चून शहरवासीयांना मिळणार स्वच्छ हवा 

aurangabad

औरंगाबाद – मोठ्या महानगरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद शहराला पुढील पाच वर्षात तब्बल 87 कोटी मिळणार आहे. यासंबंधीचा करार बुधवारी मुंबई येथे करण्यात आला. मुंबई येथील केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मंगळवारी व बुधवार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत … Read more

अर्जेटिनामध्ये ‘या’ केमिकलमुळे तलावाचे पाणी झाले गुलाबी, लोकं करत आहेत चिंता

अर्जेटिना । अर्जेटिनाच्या दक्षिणेकडील पॅटागोनिया भागात, एका मोठ्या तलावाचे संपूर्ण पाणी गुलाबी झाले आहे. तलाव आणि पर्यावरणीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,” हे तलाव गुलाबी होण्याचे कारण म्हणजे एक केमिकल आहे, ज्याचा उपयोग लॉबस्टरच्या निर्यातीत केला जातो. तलावाच्या पाण्याचा रंग सोडियम सल्फेटमुळे होतो, जो मासे कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. त्याच्या कचऱ्याला … Read more

घर सजवताना हे रोप ठेवा घरात; हवा ताजी ठेवण्यास होईल मदत

Home Air Purifying Plants in India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरातील सजावट करणे आपल्याला आनंद देते.  आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवते. काही लोकांना घरांमध्ये वनस्पती अथवा रोपे ठेवण्याची आवड असते. ते घरासोबत हिरवळ नेहमी जोडतात. झाडे आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध करत असतात. आणि घराचे सौंदर्यही वाढवत असतात. यामुळे घरामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि झाडांची रोपे ठेवने कधीही शुभ आणि लाभदायक ठरते. … Read more

सरकारचे मोठे विधान, सर्व वाहने BS 6 झाल्यावर प्रदूषण कमी होईल

नवी दिल्ली । केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी झालेल्या ‘इंडिया सीईओ फोरम ऑन क्लायमेट चेंज’ बैठकीत सहभागी झाले. या दरम्यान ते म्हणाले की, 1 एप्रिल 2020 पासून देशात BS 6 वाहनांची नोंदणी केली जात आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्व वाहने ठराविक वेळानंतर BS 6 बनतील. यामुळे आगामी काळात देशातील प्रदूषण बर्‍याच प्रमाणात कमी … Read more