हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल पेमेंट आणि कॅशलेस ट्रान्सझॅक्शनच्या सध्याच्या युगात, क्रेडिट कार्डचा वापर सामान्य झाला आहे. जर आपण क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर आपल्याला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल आणि भविष्यात आपल्याला कर्ज मिळण्यास देखील अडचण येईल. म्हणून आपण क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे महत्वाचे आहे.
बँकांच्या वेबसाइटशिवाय तुम्ही पेटीएम, फोनपे, मोबिक्विक, क्रेडिट इत्यादी थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मद्वारेही आपले क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता. त्याचबरोबर आता क्रेडिट कार्डची बिले अॅमेझॉनच्या अॅप किंवा Amazon.in वर भरली जाऊ शकतात. अलीकडेच कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.
क्रेडिट कार्ड बिल भरण्याची प्रक्रिया-
1. पहिले अॅमेझॉन अॅप मधील पे बिल्स पर्यायावर जा. तेथे क्रेडिट कार्ड बिलाचे चिन्ह दिसेल.
2. येथे पहिले सेव्ह कार्ड दिसेल. आपण कार्ड सेव्ह केले नसेल तर आपण क्रेडिट कार्ड नंबर टाका आणि नाव सेव्ह करा.
3. त्यानंतर बँक निवडा.
4. त्यानंतर, बिलाच्या रकमेबद्दल लिहा.
5. येथे आपणास पेमेंट पर्याय निवडण्याची संधी मिळेल.
6. यूपीआय किंवा नेट बँकिंग येथे पेमेंट पर्याय म्हणून उपलब्ध आहे. त्यापैकी एक निवडा. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आपण बिल भरण्यासाठी अॅमेझॉन पे बॅलन्स वापरू शकणार नाही. याशिवाय डेबिट कार्डचा पर्यायही उपलब्ध नाही.
7. त्यानंतर, पेमेंट पेजवर री डायरेक्ट झाल्यानंतर, यूपीआय पिन किंवा नेटबँकिंग क्रेडेन्शियल भरा.
8. त्यानंतर आपल्या बँक खात्यातून पैसे कट केले जाईल आणि क्रेडिट कार्ड खात्यात जमा होईल. आपण देय तारखेपासून दोन दिवस आधी क्रेडिट कार्ड बिल भरण्याचा प्रयत्न करा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.