औरंगाबाद – कालपासून इंडिगोने सकाळच्या वेळेत सुरू केलेल्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमान सेवेमुळे आता शहरातून दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीहून कनेक्टींग फ्लाईट ने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर आदी ठिकाणी जाणेही शक्य होणार आहे. यामुळे उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे.
इंडिगो एअरलाइन्स च्या वतीने 180 आसनक्षमता असलेल्या विमाने द्वारे ही सेवा सुरू केली आहे पहिल्या दिवशी या विमानाने दिल्लीहून 50 प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले तर तब्बल 122 प्रवासी औरंगाबाद हुन दिल्लीला गेले औरंगाबादेत आणखी एका विमानसेवेची भर पडली आहे हे विमान सकाळी 5:15 वाजता दिल्लीहून उड्डाण घेईल आणि सकाळी 7:15 वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर सकाळी 7:45 वाजता औरंगाबाद येथून उड्डाण घेऊन सकाळी 9:35 वाजता दिल्लीत पोहोचेल.
अहमदाबाद बेंगळूरू साठी अद्याप प्रतीक्षाच –
कोरोना लॉकडाऊन मुळे गतवर्षी विमानसेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दिल्ली, मुंबई, आणि हैदराबादची विमान सेवा पूर्ववत सुरू झाली. परंतु बेंगरूळ आणि अहमदाबादचे विमानसेवा सुरू होण्याची अजूनही प्रवाशांना प्रतीक्षाच आहे. ही दोन्ही विमाने व त्याचबरोबर मुंबईसाठी आणखी एक विमानही सुरू होण्याची शक्यता आहे.