दिवाळीनिम्मित गूगलचे ग्राहकांना मोठे गिफ्ट! आता Google Pay वरून घेता येणार थेट लोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीनिम्मित गूगल फॉर इंडिया कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. गूगलने भारतात पिक्सेल फोन्सची मॅन्युफॅक्चरिंग ते छोट्या लोन्सची सेवा आणली आहे. या छोट्या लोन्सना कंपनीने ‘सॅशे लोन’ असे नाव दिले आहे. या लोनचा फायदा आपल्याला गुगल पेच्या माध्यमातून घेता येणार आहे. आपल्याला छोट्या वा किरकोळ लॉन्सची गरज लागल्यानंतर Google Pay वरून आपल्याला हे लोन घेता येईल.

15 हजार पर्यंत मिळणार लोन

या लोन सर्विस ची माहिती गुगल इंडियाने देत सांगितले आहे की, भारतातील नागरिकांना सतत वेळोवेळी लोणची गरज पडत असते. हे लोन बँकांमधून घ्यायचे म्हणले तर त्याला खूप प्रोसेस करावी लागते. त्यामुळेच गुगल कंपनीने सॅशे लोन लाँच केले आहे. या सॅशे लोनच्या माध्यमातून आपल्याला कंपनी आपल्याला 15 हजार रूपयांपर्यंतचे लोन देणार आहे. ज्याची इएमआय फक्त 111 रुपयांपासून सुरू असेल. मुख्य म्हणजे, हे लोन घेण्यासाठी आपल्याला कोणतीही लेंदी प्रोसेस करावी लागणार नाही.

सध्या बाजारात अनेक फेक लोन देणारे ॲप्स आले आहेत ज्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत आहे.. या सर्व प्रकारावर आळा बसवण्यासाठीच गुगल फॉर इंडिया कंपनीने सॅशे लोन सेवा आणली आहे.. या सर्विसच्या माध्यमातून गरजूंना अधिकृतपणे पैसे मिळतील. यासाठी गुगल कंपनीने काही बँकांशी पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिपच्या माध्यमातून बँकांद्वारे कंपनी आपल्याला हे लोन उपलब्ध करून देईल. या लोनच्या प्रोसेसमध्ये गुगल कंपनी फक्त माध्यम म्हणून काम करेल.

दरम्यान, गुगल कंपनीनं ही सेवा ग्राहकांना देण्यासाठी, DMI, ePayLater, ICICI बँक, Axis Bank यांच्यासह पार्टनरशिप केली आहे. तसेच, कंपनीने गुगल पेसोबत एक क्रेडिट लाईनसुद्धा केली आहे, जी गरजूंना मदत करेल. गूगलने या क्रेडिट लाइन फिचरला ICICI बँकेसह लाँच केले आहे. ज्यामुळे ते पूर्णपणे विश्वासार्ह असणार आहे.