नवी दिल्ली । आधार हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता जवळपास सर्वच कामांसाठी ते आवश्यक झाले आहे. UIDAI आता हॉस्पिटलमध्येच नवजात मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे. सध्या बालकांचे आधार कार्ड बनवण्याची सुविधा रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपद्वारे बालकांचे आधार कार्ड बनवावे लागते. यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल.
आता UIDAI ने बाळाला जन्मासोबतच संपूर्ण आधार कार्ड देण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये बायोमेट्रिक्स देखील पूर्ण केले जाईल. यासाठी UIDAI, हॉस्पिटल्समध्ये ही सुविधा देण्यासाठी बर्थ रजिस्ट्रार सोबत काम करत आहे. रुग्णालयातच ही सुविधा सुरू झाल्याने लोकांना मोठी मदत होणार असून यामुळे बालकांचे आधार कार्डही सहजपणे बनवले जाणार आहे.
दररोज 2.5 कोटी बालके जन्माला येतात
UIDAI चे CEO सौरभ गर्ग म्हणतात की,”भारतात दररोज सुमारे 2.5 कोटी बाळांचा जन्म होतो. अशा परिस्थितीत UIDAI ची योजना आहे की, रुग्णालयात जन्मलेल्या मुलांचे फोटो काढल्यानंतर त्याच वेळी आधार कार्डही जारी केले जाईल. यामुळे मुलाच्या पालकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल आणि त्यांचा वेळही वाचेल. UIDAI या योजनेसाठी बर्थ रजिस्ट्रारशी मिळून काम करणार असून यासाठी बोलणी देखील सुरू केली आहे. लवकरच या विषयाबाबत एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकेल.” सध्या 5 वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डसाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, मात्र जेव्हा त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त होते, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स करणे अनिवार्य होते.
प्रादेशिक भाषांमध्येही आधार बनवण्यात येणार
UIDAI चे सीईओ सौरभ म्हणाले की,”आता आधार कार्ड प्रादेशिक भाषेतही बनवले जाईल.” ते म्हणाले की,”देशात आधार कार्डवर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेतच माहिती दिली जाते, मात्र आता ती इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. लवकरच, कार्डधारकाचे नाव आणि इतर डिटेल्स आधार कार्डवर पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, उडिया, मराठी अशा सर्व प्रादेशिक भाषांमध्येही दिसतील.”