आता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज थेट मोबाईलवर पाहता येणार, लोकसभा अध्यक्षांनी लॉन्च केले मोबाईल अ‍ॅप

नवी दिल्ली । लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी संसदेच्या कामकाजाचे प्रसारण करण्यासाठी अ‍ॅप लॉन्च करण्याची घोषणा केली. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर संसदेचे कामकाज लाईव्ह पाहू शकाल.

अ‍ॅपच्या माध्यमातून लोक सभागृहाचे थेट प्रक्षेपण तसेच दैनंदिन कामाशी संबंधित कागदपत्रे पाहू शकतील. या अ‍ॅपच्या लॉन्च प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सांगितले की,”तुमच्यासाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे, या अ‍ॅपद्वारे तुम्ही संसदेच्या कामकाजाचे मोबाइल फोन किंवा टॅबलेटवरून थेट प्रक्षेपण करू शकता आणि महत्त्वाची संसदीय कागदपत्रे पाहू शकता.

अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत
या अ‍ॅपची माहिती देताना सभापती म्हणाले की,”या अ‍ॅपद्वारे संसदीय कामकाजाशी संबंधित साहित्य, विशेषत: आजचे पेपर, कामकाजाचे थेट प्रक्षेपण, प्रश्न-उत्तर, चर्चा, बुलेटिन भाग एक आणि बुलेटिन, समित्यांचे कामकाज आदी गोष्टी पाहता येतील.” हे अ‍ॅप अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना ते डाउनलोड करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते त्यांच्या संसदीय मतदारसंघातील लोकांना संसदेत कोणत्या प्रकारचे काम सुरू आहे हे सांगू शकतील.