आता Debit Card शिवाय काढता येणार ATM मधून पैसे; देशातल पहिल UPI ATM लॉन्च

ATm
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता इथून पुढे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. कारण की, देशातील पहिलं UPI एटीएम लॉन्च करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय आधारित एटीएम मशीनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने हे ATM लाँच केलं आहे. त्यामुळे आता आपण डेबिटकार्ड ऐवजी यूपीआय पिनद्वारे रक्कम काढू शकणार आहे.

यापूर्वी आपल्याला एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी मशीनमध्ये डेबिट कार्ड टाकावे लागत होते. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया करून आपला पिन टाकून आपण पैसे काढत होतो. अनेकवेळा तर आपल्याकडून हे डेबिट कार्ड हरवून जायच्या घटना घडत होत्या. त्यामुळे पुन्हा बँकेत जाऊन डेबिट कार्ड काढण्याची वेळ यायची. मात्र आता इथून पुढे डेबिट कार्ड हरवण्याची किंवा सतत ते जवळ बाळगण्याची आपल्याला गरज पडणार नाही. आपण इथून पुढे कोठेही यूपीआय पिन द्वारे एटीएम मशीन मधून पैसे काढू शकणार आहोत. ज्या ठिकाणी यूपीआय आधारित एटीएम मशीन असेल तेथे जाऊन आपण पैसे काढू शकतो.

 ATM मधून UPI पेंद्वारे पैसे काढण्याची पद्धत

1) सर्वात प्रथम आपल्याला Welcome To UPI ATM असे दिसेल.

2) त्यानंतर आपल्याला UPI Cardless Cash यावर क्लिक करायचे आहे.

3) पुढे आपल्याला 100, 500, 1000 असे रकमेचे आकडे दिसतील. जी रक्कम आपल्याला काढायची आहे त्यावर आपण क्लिक करावे.

4) त्यानंतर आपल्याला We are processing your transaction दाखवेल आणि स्क्रीनवर QR Code दिसेल.

5) हा QR Code कोणत्याही UPI ॲपद्वारे स्कॅन करा आणि आपला जो काही पिन आहे तो फोनमध्ये टाका. तुम्ही पिन टाकल्यानंतर process वर क्लीक करा. थोड्याच वेळात एटीएममशीन मधून तुम्हाला रक्कम मिळून जाईल.

अशा सोप्या पद्धतीने आता आपल्याला इथून पुढे एटीएम मधून पैसे काढता येणार आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही डेबिट कार्डची गरज पडणार नाही. परंतु त्यासाठी तुमच्याकडे यूपीआय ॲप असणे आवश्यक आहे.