हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्याला कोणतेही सरकारी कामकाज करायचे असले तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा लागतो तो म्हणजे आधार कार्ड. शाळेत दाखला घ्यायचा असून बँकेत खाते खोलायचे असो किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असो त्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे आधार कार्ड. परंतु आता इथून पुढे आधार कार्डऐवजी जन्माचा दाखला सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारने ओळखपत्राबाबत काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. हे महत्त्वाचे नियम देशात एक ऑक्टोंबरपासून अमलात आणले जातील. केंद्र सरकारने आणलेले नियम लागू झाल्यानंतर जन्म दाखल्याचे महत्व वाढणार आहे.
नविन नियम काय आहेत?
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन नियमानुसार, एक ऑक्टोंबर पासून जन्म दाखला हेच एकमेव ओळख कागदपत्र म्हणून वापरले जाणार आहे. त्यामुळे आधारकार्डचे महत्व कमी होऊन जन्मदाखल्याला जास्त महत्त्व दिले जाणार आहे. आता इथून पुढे कोणतेही सरकारी काम करायचे असेल तर जन्म दाखला सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या मान्सून सत्रात केंद्र सरकारने जन्म दाखला संबंधित बिल मंजूर केले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याची अधिसूचना काढली आहे. हा नियम लागू झाल्यानंतर आपल्याला जन्म दाखला ऐवजी इतर कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही.
कोणत्या ठिकाणी वापर
एक ऑक्टोंबरपासून जन्म दाखला संबंधी नियम लागू झाल्यानंतर, सरकारी कामकाजात आधारकार्ड ऐवजी जन्म दाखला महत्त्वाचा ठरेल. कोणत्याही प्रकारची नोंदणी करायची असो, शाळेत दाखला घेणे, परवाना काढणे, बँकेत खाते उघडणे अशा सर्व किरकोळ कामांपासून ते महत्त्वाच्या कामांसाठी जन्म दाखल्याचा वापर अनिवार्य असणार आहे.
याचा फायद काय?
केंद्र सरकार सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमधून याविषयीचा सर्व डेटा जमा करून घेईल. यामुळे जन्म आणि मृत्यूची थेट नोंदणी निवडणूक आयोगाकडे होईल. त्यामुळे जो नागरिक 18 वर्षाचा होईल त्याचे नाव आपोआप मतदान यादीत नोंदवले जाईल. तसेच एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती आयोगाला देण्यात येईल. यानंतर आयोग मतदान यादीतून त्या व्यक्तीचे नाव काढून टाकेल.