औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना सूचना केल्या आहेत. तर रूग्णालयात बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी दोन अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाईलवर संपर्क साधून अवघ्या काही मिनिटांतच बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळणार आहे.
शहरी भागात सीसीसी, डीसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकूण ६0४१ खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये १२४४, डीसीएचमध्ये २२५ खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधा, खाटांची उपब्धता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी शहरी भागासाठी डॉ. बासीत अलीखान यांना ९३२६७८९00७, पीयूष राठोड ८८३00६१८४६ या क्र मांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात खाटा उपलब्ध आहेत की नाहीत, यासाठी डॉ. कुडीलकर यांना ९४२0७0३00८ या क्र मांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group