नवी दिल्ली । जर तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक किंवा IPPB मध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्ही हे काम ऑनलाइन देखील करू शकता. त्यासाठीची प्रक्रिया खूप सोपी आहे. अशा प्रकारची सुविधा इतर अनेक बँकांमध्ये देखील उपलब्ध आहे. आज आपण इथे IPPB चे ऑनलाइन बँक खाते उघडण्याची प्रक्रिया जाणून घेउयात .
IPPB ची स्थापना भारत सरकारच्या 100% इक्विटीसह पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही सर्वसामान्यांसाठी सुलभ आणि परवडणारी बँक आहे कारण तिला पोस्ट विभागाच्या विस्तृत नेटवर्कचा लाभ मिळतो.
IPPB मध्ये डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी
1. तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
2. KYC प्रक्रिया एका वर्षाच्या आत पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमची कागदपत्रे पोस्ट ऑफिस किंवा चेक पॉइंटवर जमा करावी लागतील.
3. KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपग्रेड केले जाईल.
IPPB मध्ये ऑनलाइन बँक खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया
1. Google Play Store किंवा App Store वरून IPPB मोबाइल बँकिंग अॅप डाउनलोड करा
2. यानंतर Open Your Account Now वर क्लिक करा
3. त्यानंतर मोबाईल नंबर टाका
4. आता तुम्हाला पॅन क्रमांक आणि आधार क्रमांकाची आवश्यकता असेल.
5. सूचनांचे पालन करून सर्व माहिती एंटर करा.
IPPB मोबाइल अॅपची वैशिष्ट्ये
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खातेदार IPPB मोबाईल बँकिंग अॅपद्वारे विविध प्रकारचे व्यवहार सहज पूर्ण करू शकतात. याद्वारे तुम्ही तुमची शिल्लक तपासू शकता, फंड ट्रान्सफर करू शकता आणि इतर आर्थिक व्यवहार करू शकता.
1. खाते शिल्लक माहिती
2. बँक स्टेटमेंटसाठी विनंती
3. चेक बुकसाठी विनंती
4. चेकचे पेमेंट थांबवण्याची विनंती
5. बँक नेटवर्कमध्ये फंड ट्रान्सफर
6. दुसऱ्या बँक खात्यात फंड ट्रान्सफर
7. वीज, पाणी आणि युटिलिटी बिले भरणे
8. मोबाईल आणि DTH रिचार्ज