आता जेवार विमानतळावरून असणार थेट ट्रेन; प्रवाशांना होणार मोठा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानतळावरून बाहेर आल्यानंतर अनेकदा टॅक्सी मिळत नाही. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ वाया जातो आणि नवीन असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून अधिकचे पैसेही घेतले जातात. मात्र आत हे होणार नाही. त्यासाठी सध्या आपल्या देशात पायाभूत सुविधा कश्या वाढवल्या जातील याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये रेल्वे, विमानतळ यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 2024 मध्ये जेवार विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतीय रेल्वेच्या नेटवर्कशी जोडण्यात आले आहे.

47 किमीचा असेल रेल्वेमार्ग

विमानतळ रेल्वे नेटवर्कशी जोडल्यानंतर प्रवासी ट्रेन मार्गाने जाऊ शकतात. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बुलंदशहरच्या चोला रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने ठेवला होता. दुसरीकडे, दिल्ली-मुंबई मार्गावर असलेल्या हरियाणातील पलवल स्टेशनशी विमानतळ जोडण्याचा सरकारचा मानस होता. आता या कामासाठी मंजुरी मिळाली असून त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे याचा फायदा प्रवाश्यांना होणार आहे.

पलवल येथे 28 किलोमीटरच्या रेल्वे मार्ग जोडला जाईल

दिल्ली – एनसीआरचे हे दुसरे विमानतळ आहे. त्यामुळे या जेवार विमानतळाला रेल्वे मार्गाने जोडणे तितकेच आवश्यक आहे.  जेवार या विमानतळाला पलवल येथे 28 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाने जोडले जाईलच, त्याचबरोबर या मार्गासह दिल्ली-मुंबई रेल्वे कॉरिडॉरशी जोडण्याची योजना अखण्यात येत आहे.

कशी असेल ही मार्गीक?

जेवर येथून सुरु झालेली ही मार्गीक दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर 33 किमी अंतरावर असलेल्या खुर्जा रेल्वे स्थानकाकडे जाईल.  तसेच दिल्ली-हावडा रेल्वे कॉरिडॉरवरील प्रस्तावित जेवर स्टेशनला चोलाशी जोडण्यासाठी आणखी 20 किमी लांबीचा रेल्वे मार्ग तयार केला जाईल.  यामुळे प्रवासासाठी चालना मिळणारच आहे. तसेच पर्यटन आणि पायाभूत सुविधामध्ये गती निर्माण होणार आहे. तसेच या मार्गामुळे आयात – निर्याति ला सुद्धा चालना मिळणार आहे. त्यामुळे हा नवीन प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.