मुंबई । लोकप्रिय मेसेजिंग ऍप आता Whatsappवरून पैसे पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयनं व्हॉट्सऍपला यासाठीची परवानगी दिली आहे. या आधी गुगल पे, फोन पे आणि इतरही माध्यमांद्वारे पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात आता व्हॉट्सऍपची भर पडली आहे. यामुळे भारतातील डिजिटल पेमेंट पद्धतीला आणखी बळ मिळेल असा विश्वास जाणकारांकडून वर्तवला जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या २ वर्षांपासून व्हॉट्स ऍप प्रायोगिक तत्वावर ही सुविधा देत आहे. मात्र त्याला एन पी सी आय ची परवानगी नसल्यानं, ती आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आली नव्हती. संपूर्ण भारतात आजच्या तारखेला तब्बल ४० कोटी जण व्हॉट्स ऍप वापरत आहेत. त्याचवेळी गुगल पेचे भारतात साडे सात कोटी आणि फोन पेचे ६ कोटी ग्राहक आहेत.
व्हॉट्स ऍप मेसेजबाबत एक नवं फिचर घेऊन आलं आहे. आलेले मेसेज सात दिवसांनंतर व्हॉट्सऍपवरून हटणार आहेत. यासाठी व्हॉट्स ऍपवर नव्यानं समावेश होणारं डिसअपिअरिंग मेसेजेस हा ऑप्शन मोबाईलधारकाला ऑन ठेवावा लागणार आहे. त्यामुळे नव्याने आलेले मेसेज सात दिवसांनंतर आपोआप व्हॉट्स ऍपवरून हटणार आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in