नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मूडीज या संस्थेने भारताच्या जीडीपी रँकिंगबाबत व्यक्त केलेल्या मताचा धागा पकडून आता मोदी कुठे आहेत?असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ट्वीट अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी दशकाच्या सर्वात खालच्या स्तरावर आहे. मूडीजनेही भारताचे सार्वभौम रेटिंग कमी केली आहे. आणि जीडीपीत ४% घसरणीचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत कोरोना संकटाच्या आधीपासूनच ही परिस्थिती आहे, तर मग पुढे काय होईल, असे म्हणत काँग्रेसने केंद्र सरकारला आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे.
सिब्बल यांनी ट्विटमध्ये सरकारबाबतचे विवादास्पद मुद्दे आणि देशाचे प्रश्न मांडले आहेत. कपिल सिब्बल यांनी ट्विटमध्ये लव्ह जिहाद, घर वापसी, सर्जिकल स्ट्राइक, ट्रिपल तलाक, ३७० कलम, यूएपीए, सीएए आणि एनआरसी हे मुद्दे उपस्थित केले आहेत. हे मुद्दे वादग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर सिब्बल यांनी देशाचे प्रश्न उपस्थि केले आहेत. यात त्यांनी आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, गरिबी, मध्यमवर्गाचे प्रश्न आणि आर्थिक मंदीचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख करताना त्यांनी पंतप्रधान मोदी कोठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकालातील पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून आपल्या कामगिरीबाबत माहिती दिली जात आहे. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविणे, नागरिकता दुरुस्ती कायदा, तिहेरी तालक विधेयक, राम मंदिराचे बांधकाम सुरू करणे आणि आणखी काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेस सातत्याने आर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्याबद्दल सरकारला लक्ष्य करत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”