आत्महत्या की हत्या? अवैध गर्भपात प्रकरणातील ‘त्या’ आरोपी नर्सचा तलावात आढळला मृतदेह

illegal abortion case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – अवैध गर्भपात (illegal abortion case) प्रकरणात आरोपी असलेल्या नर्स महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या नर्सचा खून झाला की तिने आत्महत्या केली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. बीड तालुक्यातील पालीच्या बिंदुसरा तलवात या आरोपी नर्सचा मृतदेह आढळला आहे. सीमा सुरेश डोंगरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेवर अवैध गर्भपात (illegal abortion case) प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज पहाटे या महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिचा पाली येथील तलावात सकाळी मृतदेह आढळला. हि महिला बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती.

सीमा डोंगरे यांच्यावर आज सकाळीच गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी काल या प्रकरणी एका एजंट महिलेला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सीमा डोंगरे यांचा तलावात मृतदेह आढळून आला. गर्भपाताच्या (illegal abortion case) रॅकेटवर पडदा टाकण्यासाठी तर हे घडवून आणलं गेलं नाही ना? असा संशय व्यक्त केला आहे. याशिवाय या प्रकरणातून जी मोठी नावं समोर येऊ शकतात ती नावं समोर येऊ म्हणून अशा प्रकारचा घातपात घडवून आणण्यात आलाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
पहिल्या तीन मुली असलेल्या महिलेचा चौथ्यांदा गर्भ राहिल्याने रविवारी मृत्यू झाला होता. यात शवविच्छेदन अहवालावरून हा अवैध गर्भपात (illegal abortion case) असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी मंगळवारी सकाळी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुपारी लगेच गेवराई येथील एका महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले होते. मृत 30 वर्षीय महिला हि ऊसतोड मजूर होती. तिला अगोदरच 9, 6, आणि 3 वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. पण रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. याचा संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या सगळ्या रॅकेटमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, तसेच गर्भपात कोठे झाला आणि काढलेला गर्भाची कोठे विल्हेवाट लावली, याचा तपास पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :
Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा !!!

OTT प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत Abhishek Bachchan चे मोठे विधान !!!

खुशखबर !!! नवीन M2 चिप सहित येणार नवीन MacBook Pro आणि MacBook Air

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त