Wednesday, October 5, 2022

Buy now

IND vs SA T20 : केएल राहुल सीरिजमधून बाहेर ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले कर्णधारपद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी (IND vs SA T20) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी (IND vs SA T20) कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. केएल राहुल संपूर्ण सीरिज खेळणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गुरूवारी दिल्लीमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-20 पासून भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजची सुरूवात होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरिजसाठी (IND vs SA T20) केएल राहुलला कर्णधार तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले होते. त्यामुळे आता राहुलच्या गैरहजेरीमध्ये ऋषभ पंत टीमचे नेतृत्व करणार आहे. केएल राहुल टीममध्ये नसल्यामुळे गुरूवारी ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन ओपनिंगला खेळतील. टीमने केएल राहुलच्या बदली कोणता खेळाडू खेळेल याची अजून माहिती मिळालेली नाही. तसेच केएल राहुलला नेमकी कोणती दुखापत झाली आहे, हे पण समजू शकलेले नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी (IND vs SA T20) भारतीय टीम
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

हे पण वाचा :
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

पैगंबर वादाचे पडसाद; अल- कायदाची मुंबई- दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची धमकी

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू