गडचिरोली प्रतिनिधी | ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेची आकडेवारी घोषित करण्याची मागणी करत जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसींनी पुकारलेल्या गडचिरोली बंदला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक दुकानांना ताळे पहायला मिळत आहेत.
बंददरम्यान सर्व व्यापारी, ऑटो चालक-मालक संघटनांनी या बंदला सहकार्य केले. सकाळपासूनच विविध संघटनांचे पदाधिकारी घोषणा देत दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते.
या बंददरम्यान पोलिस विभागाच्यावतीने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ आणि इतर समविचारी संघनांनी सोमवारी हा बंद पुकारला होता.
इतर महत्वाचे –