हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक खास योजना आणली आहे. लवकरच राज्य सरकार मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले योजना लागू करणार आहे. यामधूनच वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे , पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सरकार 60 हजार अनुदान देणार आहे.
इतकेच नव्हे तर, क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार 51 हजार रुपयांची मदत करणार आहे. याबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार 43 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार 38 हजार रुपये यांची मदत करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे लवकरच ओबीसी विद्यार्थ्यांना सरकारकडून आर्थिक मदत होणार आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पडला असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील नवा वाद निर्माण झाला आहे. आता ओबीसी समाजाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. या मागणीला विचारात घेऊनच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. अशा परिस्थितीचा राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.