औरंगाबाद | मराठा समाजासाठी फसवे शासन निर्णय काढून फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बतीने गुरूवारी शहरातील पैठण गेट परिसरात शासन निर्णय फाडून फिरकावत सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतने दोन्हीही सरकारच्या विरोधात लवकर दिल्लीत व मुंबईत मोठे जनआंदोलन उभारणार असून त्याची तयारी आम्ही सुरू केली असल्याचा इशाराही मराठा क्रांती यावेळी देण्यात आला. सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी फसवे जीआर काढून समाजाची फसवणूक केलेली आहे. समाजाची फसवणूक करणाऱ्या फसव्या सरकारचा शासन निर्णय फाडून ठोक मोर्चाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास धारण करून यानंतर मूक मोर्चा न करता आक्रमक मोर्चा काढून अशी भूमिका हॅलो महाराष्ट्रशी बोलताना मराठा ठोक मोर्चा कार्यकर्त्यांनी मांडली.
यावेळी क्रांती चौक पोलीसांनी रमेश केरे, किरण काळे, राहुल पाटील, मनोज मुरदारे, कृष्णा उघडे, स्वप्निल चाळक, अप्पासाहेब जाधव, अशोक गाढे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक करून नंतर सोडून देण्यात आले. सरकार पोलीस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर दडपशाहीचा प्रयत्न करत असल्याने सरकारचा जाहीर करण्यात आला.