कोल्हापूरात कोरोनाच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
एका वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हनुमान नगर ते बावड्याच्या हद्दीत नदी किनाऱ्यावरती त्यांचा मृतदेह आढळलाय. 68 वर्षीय असणाऱ्या मालुबाई आकाराम आवळे असं आत्महत्या केलेल्या वृद्ध महिन्याचे नाव आहे. या वृद्ध महिलेने कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या केल्याच्या चर्चेला सध्या परिसरात उधाण आलं आहे.

मालूबाई आवळे या मुलगा बाळू, सून आणि नातवंडे यांच्यासोबत शिरोली औद्योगिक वसाहत मधील इंडस्ट्रीज येथे राहत होत्या. मुलगा बाळू हा एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतोय. मालुबाई नातवंडांना कारखाना का बंद आहे ? याची विचारणा करत होत्या. त्यावेळी त्यांना कोरोना विषयी माहिती मिळाली. हा आजार वयोवृद्ध व्यक्तींना होतो आणि त्यांच्या मार्फत तो इतरांना होतो या गोष्टीची धास्ती त्यांनी घेतली.

गुरुवारी अचानक त्या घरातून बाहेर पडल्या. मात्र, बरच वेळ होऊन त्या घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची परिसरात शोधाशोध केली. शेवटी त्यांचा पत्ता लागत नसल्याने अखेर त्यांच्या कुटुंबीयांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. दरम्यान, नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या मालुबाई असल्याचं सिद्ध झालं.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.