दहिसरमध्ये दिवसाढवळ्या गोळी झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दहिसरमध्ये दिवसा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये ३ अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या केली आहे. हि घटना दहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात घडली आहे.

ओम साईराज ज्वेलर्स असे या ज्वेलर्स दुकानाचे नाव आहे. ३ अज्ञात व्यक्ती बंदुकीचा धाक दाखवून ओम साईराज ज्वेलर्स या दुकानात शिरले. यानंतर त्यांनी सगळे दुकान लुटले. यादरम्यान ओम साईराज ज्वेलर्सच्या मालकाने त्यांना विरोध केला असता त्याच्यावर या तिघांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये ज्वेलर्सच्या मालकाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुंबई पोलिसांचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेतील तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत. यानंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध घेत असताना सर्व मुंबई एन्ट्री पॉईंटवर नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.